धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार सौ. नेहा राहुल काकडे तसेच प्रभाग क्र. 9 मधील नगरसेवक पदाचे उमेदवार सौ. दिपाली अरुण यादगिरे आणि श्री. सुजीत दिपकराव साळुंके यांच्या प्रचारार्थ समता नगर व परिसरात भव्य रॅली काढण्यात आली.

धाराशिव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या सक्षम नेतृत्वात धाराशिव नगर परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकणार, असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला.

या भव्य रॅलीमध्ये श्री. दत्ताभाऊ कुलकर्णी, श्री. नितीन भोसले, श्री. युवराज नळे, श्री. अमरसिंह देशमुख, श्री. संदीप साळुंके, श्री. सुजित साळुंके, श्री. आशिष पाटील, सौ. सुनिताताई साळुंके, सौ. वर्षाताई युवराज नळे, शिवानीताई परदेशी, श्री. वैभव मोरे, श्री. गिरीश पानसरे यांच्या प्रभागातील कार्यकर्ते, नागरिक व माताभगिनी मोठ्या संख्येने उत्साहाने सहभागी झाले. 

 
Top