भूम (प्रतिनिधी)- शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय, भूम येथील मराठी विभाग प्रमुख प्रा. गंगाधर काळे यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल “ग्लोबल एज्युकेशन स्टार अवॉर्ड 2025” हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा सन्मान “नॅशनल विदर्भ आर्ट्स, सोशल कॉन्फरन्स अँड अवॉर्ड सेरेमनी”, नागपूर येथे युनिव्हर्सल टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्डस् आणि समृद्धी पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 3 ऑगस्ट 2025 रोजी प्रदान करण्यात आला. या समारंभाला देशभरातील नामवंत शिक्षणतज्ज्ञ, साहित्यिक आणि समाजसेवक उपस्थित होते. प्रा. काळे यांच्या या यशाबद्दल शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष शिंदे यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले, तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रा. गंगाधर काळे यांच्या या कामगिरीबद्दल भूम परिसरातील शिक्षकवर्ग, विद्यार्थी आणि नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
