भूम (प्रतिनिधी)- भूम येथील गुरुदेव दत्त हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची बैठक 9 नोव्हेंबर रोजी गुरुदेव दत्त हायस्कूल येथे संपन्न झाली.

या बैठकीमध्ये माजी मुख्याध्यापक कल्याणराव मोटे, अरुण गायकवाड, लगाडे, गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली गुरुदेव दत्त हायस्कूल भूम माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यात आला. शाळेसाठी माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून शाळेतील मुलासाठी आरो फिल्टर बसवणे, शाळेत सोलर सिस्टिम बसवणे, आधुनिक पद्धतीचे स्मार्ट डिजिटल बोर्ड, अद्यावत सुसज्ज स्पर्धा परीक्षा ग्रंथालय उभारणे, सर्व वर्गात सीसीटीव्ही बसवणे, शाळेत विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवणाऱ्या मुलांसाठी प्रेरणा मिळवावे म्हणून पारितोषिके ठेवणे अशा विषयावर चर्चा होऊन प्रधान्य क्रमांकाने सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे या बैठकीमध्ये ठरवण्यात आले.

या बैठकीमध्ये प्रथम प्रधान्य विद्यार्थ्यांसाठी आरो फिल्टर बसवण्यासाठी देण्यात आले तसेच सोलर सिस्टिम बसवणे यासाठीही सहकार्य करणार असल्याचे माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी गुरुदेव दत्त माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी संदीप बागडे,सचिव पदी उमेश ढगे ,कोषाध्यक्ष निशिकांत गाढवे,उपाध्यक्ष गणेश तांबे,नवनाथ रोकडे,गणेश पवार,सुधीर बागडे,तानाजी वडेकर, सिराज मोगल,अजित मस्कर ,हरिभाऊ महामुनी उपस्थित होते.


 
Top