भूम (प्रतिनिधी)- मयुरी मनोज मुंजाळ या विद्यार्थिनीची नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा, मुलाखत दोन्ही टप्पे यशस्वीरित्या पूर्ण करत जानेवारी महिन्यात इस्रो, आयआयटी गांधीनगर, या वैज्ञानिक स्थळाला भेट देण्याची संधी तिला मिळाल्याबद्दल तसेच संजना अमोल बळे या विद्यार्थिनीची एलन करियर इन्स्टिट्यूट मार्फत घेण्यात आलेल्या टॅलेंटेक्स परीक्षेत ऑल इंडिया रॅक 564 मिळवत स्कॉलरशिपसाठी पात्र झाल्याबद्दल वरील दोन्ही विद्यार्थिनींचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे प्रशालेच्या वतीने सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी संस्थेचे सचिव आर.डी.सुळ, मुख्याध्यापक उत्तम सुरवसे, उपमुख्याध्यापिका शर्मिला पाटील, पर्यवेक्षक मिलिंद लगाडे तसेच धनंजय पवार, भागवत लोकरे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
