धाराशिव (प्रतिनिधी)- प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा 21 वा हप्ता बुधवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. रब्बी पेरणीच्या तोंडावर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असल्याने शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील 2 लाख 35 हजार शेतकरी पीएम सन्मानसाठी पात्र आहेत. 

शेतकऱ्यांना शेती कामांसाठी येणाऱ्या अडचणी लक्षात येता शासनाकडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत वर्षाकाठी तीन हप्त्यात 6 हजार रूपये खात्यात जमा केले जात आहेत. चार महिन्याच्या कालावधीत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कमही जमा केली जात आहे. 20 वा हप्ता शेतकऱ्यांना ऑगस्ट महिन्यात मिळाला होता.  जिल्ह्यात या योजनेच्या लाभासाठी 2 लाख 35 हजारावर शेतकरी पात्र आहेत. पात्र लाभार्थींना हप्त्यासाठी ई-केवायसी, आधार प्रमाणीकरण, लॅड सीडिंग, फार्मर आयडी अनिवार्य केले आहे. अटीची पुर्तता केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जात असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. 

 
Top