धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील भाजप पक्षाचे नेते पांडुरंग लाटे यांचे चिरंजीव अमित पांडुरंग लाटे यांनी रविवारी दि. 22 नोव्हेंबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यांच्यासह कृष्णा जाधवर, किरण लोखंडे, राहुल शिरशीकर, काका कोळी यांचा खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील,माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे.
यावेळी अमित लाटे म्हणाले की, माझ्या वडिलांनी डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यापासून अगदी आता मल्हार पाटील यांच्यापर्यंत काम केलं. पण त्यांच्याकडून कधीही आमच्या निष्टेच मोल केलं नाही. निष्ठावंत सोडून काही दिवसात पक्षात आलेल्याना तिकीट दिले जात आहे. हे अन्यायकारक आहे, पक्षातल्या कोणालाही संधी दिली असती तर नाराजीचा प्रश्न नव्हता. अशा निर्णयामुळे ही नाराजी उफाळून आली आहे. माझी ही प्रातिनिधिक भूमिका यापेक्षा तीव्र भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.
यावेळी अमित उंबरे,भारत काकडे, सात्विक दंडनाईक, विक्रम पाटील, दीपक जाधव, संजय भोरे, अभिजीत देशमुख,अजिंक्य राजेनिंबाळकर, लखन देशमुख, गणेश एडके,रोहित दंडनाईक, अक्षय मिसाळ उपस्थित होते. हिंदुहृदयासम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची विचारसरणी आणि उद्धवसाहेबांचे संवेदनशील नेतृत्व यामुळे लोक मोठ्या संख्येने शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली एकत्र येत आहेत. त्यांच्या प्रवेशाने स्थानिक पातळीवरील शिवसेनेचे संघटन आणखी भक्कम झाले आहे.
