धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव नगर पालिकेच्या निवडणुकीत काही शिवसैनिकांना शिवसेना उबाठा गटाने उमेदवारी डावलली असून, त्यामुळे माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर व त्यांचे पुत्र यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.  त्यांच्यासोबत शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

शिवसेना उबाठा गटातून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये काही माजी नगरसेवकांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर यांनी आपल्या मुलीसाठी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मागितली होती. परंतु शिवसेनेच्या वतीने निष्ठावंत शिवसैनिक सोमनाथ गुरव यांच्या पत्नीस उमेदवारी दिली आहे. माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर यांनी शिवसेना सोडल्यानंतर संभाजी सलगर यांनी भाजप सोडून सेनेत प्रवेश केला. 

 
Top