परंडा (प्रतिनिधी)- सार्वजनिक बांधकाम, उपविभाग परंडा येथील सेवावृत्त कनिष्ठ अभियंता सौदागर टोंपे यांची कन्या व भाजपा माजी जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोंपे यांची पुतणी श्रध्दा सौदागर टोंपे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा 2024 मध्ये घेण्यात आलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परिक्षेत पहिल्या प्रयत्नात महाराष्ट्र सर्वसाधारण गुणवत्ता यादीत पाचव्या क्रमांकाने तर मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. श्रध्दा हिने वयाच्या 22 व्या वर्षी हि परिक्षा उत्तीर्ण होऊन उपविभागीय जलसंधारण अधिकारी (वर्ग-1) पदी निवड झाली. या यशाबद्दल भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी संवाद निवासस्थानी श्रध्दा हिचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपा माजी जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, न.प. माजी गटनेते सुबोधसिंह ठाकूर, सुखदेव टोंपे, कृष्णा चैतन्य, सौदागर टोंपे, भोसले उपस्थित होते.
