भूम (प्रतिनिधी)- ज्ञान ज्योती सावित्रीमाई फुले शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित भूमच्या वतीने 20 लाख रुपये कर्जवाटपाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या विचाराने व बाळकृष्ण तांबारे यांचे मार्गदर्शनाखाली वाटचाल करणाऱ्या या पतसंस्थेच्या संचालक मंडळाने 20 लाख रुपये कर्जमर्यादा करण्याची घोषणा सप्टेंबर 2025 मध्ये सर्वसाधारण सभेत केली होती त्याची अंमलबजावणी आज व्हाईस चेअरमन श्रीमती जयश्री माळी/मुळे यांचे हस्ते करण्यात आली. संस्थेच्या कारभाराची अशीच वेगवान घोडदौड सुरु आहे. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन सोमनाथ टकले, हरी पवार, सुनील गुंजाळ, नितीन मस्तुद, जमील तांबोळी, परशुराम राऊत, अशोक जाधवर, सोमनाथ राऊत, वैशाली डांगे, आशा शिंदे, अनुराधा बाशिंगे, सूर्यवंशी मॅडम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.


 
Top