कळंब (प्रतिनिधी)- कळंब नगर परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीमध्ये नगराध्यक्ष पदावरून तू -तु मैं- मै होत असल्याची चर्चा राजकीय गोठात आहे. तर तर काही ठिकाणी नणंद भावजयामध्ये तर काही ठिकाणी जावा -जावात मैत्रीपूर्ण लढती होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तर एकमेकांचे पाहुणे आता कट्टर वैरी होणार का असेही चर्चा सध्या आता राजकीय धुरळ्यात होत आहे. कळंब च्या राजकारणात ही मोठी घडामोड निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडली असून राजकीय भूकंप होण्याची ही दाट शक्यता निर्माण झाली आहे.
आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षएकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याने पूर्ण पॅनलनीशी आपआपले फॉर्म आज शेवटच्या दिवशी दाखल केले. तर नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार काँग्रेस यांच्या वतीने प्रा. मीनाक्षी भवर यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला. त्याचबरोबर महायुती मधून शिवसेना शिंदे गट व भाजपा यांच्या वतीने राणी शिवाजी कापसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीने रश्मी संजय मुंदडा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर अपक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष मीरा सोंडे यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता नगराध्यक्ष पदासाठी नगर परिषदेच्या रिंगणात तिरंगी लढत होणार आहे. नगरपरिषद निवडणुकीसाठी आजवर नगराध्यक्षपदासाठी एकूण 20 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. तर नगरसेवक पदासाठी शेवटच्या दिवशी 234 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. नगरपालिकेच्या निवडणूकीचा बिलगुल वाजल्यानंतर राजकीय रणधुमाळी मात्र शिगेला पोहोचली आहे.