परंडा (प्रतिनिधी)- परंडा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी सोमवार दि.17 रोजी नगराध्यक्ष पदासाठी पाच तर सदस्य पदासाठी 62 तर एकूण 67 उमेदवारी आर्ज निवडूक अधिकारी यांच्या कडे दाखल करण्यात आले आहे.उमेदवारी आर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने नगरपरिषद कार्यालय परिसरात छावणीचे स्वरूप आले होते.
नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने माजी नगरध्यक्ष जाकीर इस्माईल सौदागर, महंमद सवेर महंमद ईसमाईल सौदागर तर जनशक्ती शहर विकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी विश्वजित ज्ञानेश्वर पाटील सह कुरेशी ईसमाईल अब्दूल सत्तार, मुजावर आब्बास उमर यांनी आपली नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल केले आहेत.
शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाकीर सौदागर यांचा उमेरवारी अर्ज दाखल माजी मंत्री तथा आमदार तानाजीराव सावंत, जिल्हाप्रमुख दत्ता सांळूंके, चंद्रकांत घोगरे,आरपीआयचे संजयकुमार बनसोडे, दिलीप रणभोर, विकास पवार, वाजीद दरवणी, मतीन जिनेरी,जावेद पठाण ईरफान शेख,सह सौदागर यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी आर्ज दाखल करण्यात आला. जनशक्ती शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वजित पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी आमदार राहूल मोटे, जिल्हाप्रमुख रणजित पाटील, मुकूल देशमुख,ॲड. नुरुद्दीन चौधरी, राहूल बनसोडे, नसीर शहाबर्कीवाले, शब्बीर पठाण यांच्या उपस्थितीत पाटील यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी दाखल करण्यात आला.
वीस सदस्य जागांसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 138 उमेदवारांनी आपले आर्ज दाखल केले आहेत. नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत खरी लढत शिवसेना शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर व जनशक्ती शहर आघाडीचे उमेदवार विश्वजित पाटील यांच्यात खरी लढत व चुरशीची होणार आहे.बाकीचे नगराध्यक्ष पदासाठी दाखल केलेले उमेदवार अर्ज डमी उमेदवार असल्याचे समजते.
