धाराशिव (प्रतिनिधी)- अखिल भारतीय संस्कार भारती सर्वसाधारण सभा महर्षी व्यास सभागृह रेशीमबाग नागपूर येथे दि. ८ व ९ नोव्हेंबर २०२५रोजी संपन्न झाली.या सभेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अखिल भारतीय संस्कार भारती चे राष्ट्रीय अध्यक्ष म्हैसुर मंजुनाथ ,राष्ट्रीय महामंत्री अश्विन  दलवी ,विदर्भ प्रांत संस्कार भारती अध्यक्षा सौ.कांचन नितीन गडकरी , झाडीपट्टी नाटककार पद्मश्री परशुराम खुणे, मोझरीचे सरचिटणीस जनार्दन बोथे यांच्या उपस्थितीत उदघाटन सोहळा संपन्न झाला . 

दोन दिवशीय सभेत सपुर्ण भारतातील राज्यातून अपेक्षित पदाधिकारी ४०० कला साधक उपस्थिती होती. यात प्रांतस्तरीय अध्यक्ष ,महामंत्री , कोष प्रमुख , संयोजक उपस्थित होते.  ४ सत्रात सभा होऊन संघ गीतांचा नृत्या सह सांस्कृतिक कार्यक्रम,'पुर्ण विजय संकल्प हमारा' सामुहिक गीत गायन , कोषबाबत चर्चासत्र, बौद्धिक, विधानिहाय संयोजक गट चर्चाआदि बाबत चर्चा सत्रे होऊन वंदेमातरमने सांगता झाली . या सभेसाठी संघटन मंत्री अभिजीत गोखले , उपाध्यक्ष नितीश भारद्वाज , पूर्व अध्यक्ष वासुदेव कामत ,पश्चिम क्षेत्र प्रमुख चंद्रकांत घरोटे , मान्यगण राष्ट्रीय पदधिकारी देवगिरी प्रांतातील अपेक्षित १४ पदाधिकारी पैकी देवगिरी प्रांत संस्कार भारती अध्यक्षा प्रा.स्नेहल पाठक , महामंत्री डॉ.जगदीश देशमुख ,सहमहामंत्री डॉ.सतिश महामुनी, कोषप्रमुख मोहन रावतोळे , सहकोषप्रमुख विधिज्ञ संजय घायाळ , मंचीय कला संयोजक जयंत शेवतेकर, दृश्य कला संयोजक कलाध्यापक शेषनाथ वाघ , धरोहर संयोजक दत्तप्रसाद गोस्वामी , लोककला संयोजक डॉ. मार्तंड कुलकर्णी उपस्थित होते . संस्कार भारती देवगिरी प्रांत निर्मित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी निमित्त दैनंदिनी २०२५ - २०२६ प्रत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रांत दृश्य कला संयोजक शेषनाथ वाघ यांनी सस्नेह दिली.

 
Top