धाराशिव (प्रतिनिधी)- बैठकीसही हजर राहिले नाहीत व कार्यालयातही अनुपस्थित असल्याचे लक्षात आल्याने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी ए. पी. कुतवळ यांच्याविरूध्द मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी मंगळवारी निलंबनाची कारवाई केली.

11 नोव्हेंबर रोजी कुतवळ यांनी बैठकीस उपस्थित राहणे आवश्यक होते. मात्र ते अनुपस्थित असल्याने त्यांना सहाय्यक प्रशासन अधिकाऱ्यांनी वारंवार फोन केला. तरीही ते बैठकीस हजर राहिले नाहीत. यानंतर शिक्षण विभागात पाहणी केली असता तिथेही अनुपस्थित होते. दरम्यान, महत्वाच्या बैठकीस अनुपस्थित असल्याने आस्थापना विषयक बाबींचा आढावा घेता आला नाही, असा आदेशाद्वारे ठपका ठेवत सीईओ डॉ. घोष यांनी मंगळवारी कुतवळ यांच्याविरूध्द निलंबनाची कारवाई केली. 

 
Top