भुम (प्रतिनिधी)- प्रधानमंत्री कृषी सिंचन पाणलोट विकास योजना घटक 2.0 अंतर्गत वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा पुणे, जल व भूमी व्यवस्थापन (वाल्मी) संभाजीनगर, जलसंधारण विभाग धाराशिव, जय बजरंगबली ग्रामविकास मंडळ, भूम (PTO )यांच्या वतीने धाराशिव क्लस्टर क्र. 4 कारी येथे दि. 10/11/2025 रोजी पाणलोट जाणीव जागृती प्रशिक्षण कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमांची सुरुवात जिजाऊ, सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. उदघाटन कार्यक्रम, सरपंच निलम कदम, जलसंधारण, कृषी विभाग लक्ष्मी कांत पवार, संकेत सर, सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदे, पाणलोट समिती पदाधिकारी, प्रविण प्रशिक्षक, जय बजरंगबली ग्रामविकास मंडळ भूम चे सचिव प्रमोद शेळके हे हजर होते. या प्रशिक्षणात प्रधानमंत्री कृषी योजना- पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत पाणलोट विकासाचे महत्व, पाणलोट समितीची रचना, अध्यक्ष व सचिव यांची भूमिका, प्रकल्प आमंबजाववणी मध्ये, स्वयं सहायता गट, शेतकरी गट, ग्रामपंचायत सदस्य यांची भूमिका, पाणलोट विकासाच्या विविध उपचार प्रकार यावाबत सविस्तर माहिती प्रवीण प्रशिक्षक बाबासाहेब वडवे, शारदा गायकवाड, सुवर्णा पंढरे यांनी प्रशिक्षणार्थी यांना दिली.

बचत गट सदस्य,पाणलोट समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य हे प्रशिक्षण साठी हजर होते.


 
Top