नळदुर्ग (प्रतिनिधी)- येथील पालिकेच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन छाननीच्या नंतर निवडणुक रिंगणात नगराध्यक्ष पदासाठी सात तर नगरसेवक पदासाठी 135 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज पात्र झाले आहेत. दरम्यान नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी जवळपास पंचरंगी निवडणुक होणार असल्याचे स्पष्ट पणे दिसून येत आहे.
मंगळवार दि. 18 रोजी नगर पालिकेच्या सभागृहात सकाळी अकरा वाजता निवडणुक निर्णय अधिकारी प्रमोद गायकवाड व सहाय्यक अधिकारी रामकृष्ण जाधवर यांनी उमेदवारी अर्जाची छाननी सुरु केली. पहिल्या प्रथम नगराध्यक्ष पदाच्या अर्जाची छाननी करण्यात आली, त्या नंतर नगरसवेक पदाच्या उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली. एकूण 189 प्राप्त उमेदवारी अर्जाची छाननी करीत असताना नगराध्यक्ष पदासाठी एकूण सात उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आली तर नगरसेवक पदासाठी 135 उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले. यामध्ये एकूण 47 अर्ज अवैध ठरविण्यात आले. त्यामुळे आता नगरपालिकेया निवडणुक रिंगणात नगरध्यक्ष पदासाठी सात जण तर नगरसेवक पदासाठी एकूण 135 जण शिल्लक राहीले आहेत. नगरायक्षा साठी आता काँग्रेसकडून अशोक जगदाळे तर भाजपा शिंदे सेना युतीकडून बसवराज धरणे हे निवडणुक रिंगणात राहणार आहेत तर एमआयएम पक्षा कडून माजी नगराध्यक्ष शहेबाज काझी हे निवडणुक रिंगणात आहेत, तर माजी नगरसेवक संजय बताले हे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस कडून नगराध्यक्ष पदाची निवडणुक लढविणार आहेत याशिवाय शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून महेबुब शेख हे निवडणुक रिंगणात आहेत, त्याच बरोबर मोहम्मद मुज्जमील शेख यांच्या सह शेख ताजोददीन बशीर अहेमद हे ही रिंगणात आहेत परंतु अर्ज माघार घेण्याच्या दिवशी पर्यत किती अर्ज मागे घेतली जातील यावरच निवडणुकीची रंगत कळणार आहे. या वेळेस नळदुर्गच्या पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणुकीत एमआयएम पक्षाचा प्रवेश झाल्याने मोठया प्रमाणात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान इतर प्रभाग क्र 1 ते प्रभाग क्रं. 10 मध्ये ही मोठया प्रमाणात तिरंगी ते चौरंगी लढती पहावयास मिळतील त्यामुळे पालिकेच्या सत्ता संघर्षात मोठया प्रमाणात चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत एकूण 17 हजार दोनशे मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.