भूम (प्रतिनिधी)- भूम नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत दि. 18 नोव्हेंबर रोजी अर्ज छाननी जनशक्ती नगर विकास आघाडीच्या दोन उमेदवारांचे तर आलम प्रभू शहर विकास आघाडीच्या एका उमेदवाराचे अर्ज छाननीअंती बाद ठरवण्यात आले .

भूम नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी 9  उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते .ते तसेच राहिले .नगरसेवक पदासाठी 84 अर्ज आले होते. त्यापैकी जनशक्ती नगर विकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल महादेव बागडे (9 अ),विद्या संदीप खामकर (4 अ) तर आलमप्रभू शहर विकास आघाडीच्या अनुराधा प्रवीण साठे (1 अ) अर्ज बाद झाले आहेत. निवडणूक निर्णयाधिकारी उपजिल्हाधिकारी रैवायाह डोंगरे यांनी ही माहिती दिली. परंतु ज्या ठिकाण चे अर्ज बाद झाले आहेत त्या प्रभागामध्ये दुनिया आघाडीच्या वतीने अधिक फॉर्म असल्याने एकास एक लढत निश्चित आहे.


 
Top