भूम (प्रतिनिधी)- खोपोली (जि. रायगड) येथे झालेले असलेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत रविंद्र हायस्कूल, भूम येथील विद्यार्थी रोहित माने याने 17 वर्षे वयोगट व 60 किलो वजनी गटात तृतीय क्रमांक मिळवत भूम तालुक्याचा मान उंचावला आहे.
रोहित माने हा सलग चार वर्षे विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळविणारा खेळाडू असून, राज्यस्तरीय स्पर्धेतही त्याने आपली दमदार कामगिरी कायम ठेवली.
या उल्लेखनीय यशाबद्दल रोहित माने याचा व त्याचे मार्गदर्शक क्रीडा प्रशिक्षक अमर सुपेकर (कबड्डी कोच) यांचा शाळेतर्फे सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव आर.डी. सुळ, कोषाध्यक्ष डॉ. विजयकुमार सुळ, मुख्याध्यापक उत्तम सुरवसे सर, उपमुख्याध्यापिका शर्मिला पाटील मॅडम, पर्यवेक्षक मिलिंद लगाडे सर, तसेच धनंजय पवार, भागवत लोकरे, रविंद्र प्राथमिकचे मुख्याध्यापक लक्ष्मण देशमुख , शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोहितच्या या कामगिरीमुळे भूम तालुक्याच्या क्रीडाक्षेत्रात आणखी एक अभिमानाची नोंद झाली आहे.
