धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. नेहाताई राहुल काकडे, प्रभाग क्र.14 चे भाजपा आरपीआय महायुतीचे उमेदवार सौ. अस्मिताताई उदय बनसोडे व संग्राम बनसोडे, तसेच प्रभाग क्र.15 चे उमेदवार श्री. नरेन वाघमारे व सौ. सरोजा दत्ता पेठे यांच्या प्रचारार्थ भाजपचे युवा नेते मल्हार दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज काढण्यात आलेल्या भव्य प्रचार फेरीला नागरिकांचा अविस्मरणीय, जोशपूर्ण आणि प्रचंड प्रतिसाद लाभला.
भीमनगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला भगिनी आणि उत्साही समर्थकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत विजयाचा नारा बुलंद केला, यामुळे धाराशिव बदलाच्या दिशेने वेगाने पुढे जात असल्याचे स्पष्ट चित्र दिसले. धाराशिवच्या सर्वांगीण विकासासाठी, सुरक्षित भविष्यासाठी, सुशासनासाठी आणि नागरिकांच्या प्रगतीसाठी भाजपच सक्षम आहे, हा ठाम विश्वास आजच्या महाप्रचाराद्वारे पुन्हा एकदा अधोरेखित झाला.
नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा पाहता आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भाजपचा विजय अनिवार्य असल्याची खात्री सर्वांच्या मनात अधिक दृढ झाली आहे. यावेळी श्री.विद्यानंद बनसोडे, श्री.सिद्धार्थ बनसोडे, श्री.मुन्ना ओव्हाळ, श्री.सोमनाथ गायकवाड, दत्ता पेठे, मेसा जानराव, श्री.प्रशांत माळाले यांच्यासह प्रभागातील प्रमुख कार्यकर्ते व नागरिक, माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
