धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी भाजपाच्यावतीने नेहा काकडे उभ्या आहेत. त्यांच्या प्रचारासाठी भाजपाच्या जि. प.च्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील सक्रीय प्रचारात उतरल्या आहेत.
धाराशिव नगर परिषद निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ.नेहाताई राहुल काकडे तसेच प्रभाग क्र.20 मधील नगरसेवक पदाचे उमेदवार श्री.विलास मारुती लोंढे आणि सौ.वंदना बापू पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा, खास करून महिलांचा प्रतिसाद इतका प्रचंड होता की संपूर्ण वातावरण उत्साहाने ओसंडून वाहत असल्याचे दृश्य पाहायला मिळाले. यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.नेहाताई काकडे, श्री.सुनील काळे, श्री.विलास लोंढे, श्री.बापू पवार, श्री.सागर दंडनाईक यांच्यासह उषाताई सर्जे मॅडम, शिवानीताई परदेशी यांच्यासह प्रभागातील प्रमुख कार्यकर्ते वमाता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
