धाराशिव (प्रतिनिधी)- भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. नेहाताई राहुल काकडे, प्रभाग 8 चे उमेदवार सौ. किरण ईश्वर इंगळे व श्री. युवराज वीरसेन राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ गवळी गल्ली येथे कॉर्नर बैठक घेऊन प्रभागातील नागरिकांशी संवाद साधला.
येथील प्रसिद्ध श्री बाल हनुमान गणेश मंडळ येथे आरती करून गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी गणेश मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक भालचंद्र हुच्चे, संतोष हंबीरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी शहराच्या विकासकामांबाबत सकारात्मक चर्चा केली. कधीकाळी 100 टँकरने पाणी आणावे लागणाऱ्या धाराशिव शहराला आज राज्य आणि केंद्र सरकारच्या मदतीने उजनी पाणी पुरवठा योजना यशस्वीपणे मिळवून दिली. धाराशिवकरांना आता 24 तास स्वच्छ आणि मुबलक पाणी उपलब्ध करून देण्याचा आपला ठाम निर्धार असल्याचे सांगितले. याचबरोबर शहरातील विविध भागांमध्ये 25 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी वापरून आकर्षक बागबगीचे आणि वृक्षलागवड करण्याची नगरपालिका पुढाकार घेणार आहे. स्वच्छ, हिरवेगार आणि पर्यावरणपूरक धाराशिव घडवण्यावर भर दिला जात आहे.
लवकरच धाराशिव हे मुबलक पाणी आणि बागबगीचे असलेले सुंदर व विकसित शहर म्हणून राज्यात आणि देशात ओळखले जाईल, याचा दृढ विश्वास आहे. धाराशिवच्या विकासासाठी भाजपच्या उमेदवारांना बहुमतांनी विजयी करावे असे आवाहन केले. यावेळी श्री.राजसिंह राजेनिंबाळकर, युवराज राजेनिंबाळकर, श्री.राहुल काकडे, श्री.प्रवीण पाठक, श्री.कुणाल निंबाळकर, श्री.राम मुंडे, श्री.प्रसाद मुंडे, श्री.बाळासाहेब खांडेकर, श्री.प्रवीण शिरसाट यांच्यासह गवळी गल्ली, सोनार लाईन येथील व्यापारी बांधव उपस्थित होते.
