धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य खो खो  असोसिएशन ची कुमार व मुली राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धा 04 डिसेंबर ते 07 डिसेंबर 2025 दरम्यान बुऱ्हाणनगर (जिल्हा  अहिल्यानगर)येथे होणार आहेत. तरी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी धाराशिव जिल्हा संघ निवड चाचणी स्पर्धा गुरुवार दिनांक. 27 नोंव्हेबर 2025 रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट कॉलेज) येथे आयोजित करण्यात आली आहे. ज्या खेळाडूंची जन्मतारीख 05 जानेवारी रोजी किंवा त्यानंतर जन्मलेले आहेत असे खेळाडू या स्पर्धेत पात्र आहेत. तरी या खेळाडूंनी दुपारी 4.00 वाजता वयाचा दाखला(आधार कार्ड,बोनाफाईड सर्टीफिकेट) घेवून उपस्थित राहावे. निवड समिती सदस्य म्हणून अभिजीत पाटील, रोहिणी सातपुते (आवारे), गौरी शिंदे काम पाहणार आहेत.  तरी जास्तीत जास्त खेळाडूंनी निवड चाचणीस उपस्थित रहावे. असे आवाहन सचिव प्रविण बागल यांनी केले.

 
Top