धाराशिव (प्रतिनिधी)- व्ही. पी. शैक्षणिक संकुल छत्रपती संभाजी नगर रोड, धाराशिव येथील कृषि हाविद्यालय व श्री साई जनविकास आय टी आय मध्ये  डॉ. प्रतापसिंह पाटील व करण प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

सर्व प्रथम घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी व प्राध्यापकांच्या उपस्थितीत संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करून झाली. विद्यार्थ्यांनी एकच स्वरात प्रास्ताविकेचे पठण करत लोकशाही, समता, स्वातंत्र्य व बंधुता या संविधानिक मूल्यांबद्दल ठाम निष्ठा व्यक्त केली. या प्रसंगी प्राचार्य डॉ. क्रांतिकूमार पाटील यांनी  विद्यार्थ्यांना संबोधित करत संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेचा इतिहास, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान आणि भारतीय लोकशाहीची वैशिष्ट्ये यावर मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. मोहसीन शेख यांनी “युवकांची संविधानिक कर्तव्ये” या विषयावर प्रभावी व्याख्यान दिले इंजिनिअरिंगचे प्राचार्य यांनी संविधान देशाला सार्वभौम ,समाजवाद ,धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्तक घोषित करते आणि न्याय  स्वातंत्र, समता आणि बंधुता यासारख्या मूल्यांची हमी देते असे मौलिक विचार मांडले.

या कार्यक्रमासाठी कृषि महाविद्यालयाचे व्यवस्थापक प्रा. हरी घाडगे, डॉ. अमित गांधले प्रा. शेटे डी.एस. प्रा. दळवे एस. ए., प्रा. शिंदे ए. एस., प्रा. भालेकर एस. व्ही.,  प्रा. गोटे पी. पी., डॉ. घोडके बी. डी., प्रा. नवनाथ मुंडे, प्रा. प्रवीण माळी प्रा. सुतार आर. व्ही. ग्रंथपाल कांबळे ए.बी, ओंकार गिरी, तसेच आय टी आयचे  व्यवस्थापक प्रा. डी. एम. घावटे ,एस.आर. पुदाले, एस. एस. भोरे, एस. एस. सुतार तसेच विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक व  आभारप्रदर्शन प्रा. डी. एम. घावटे यांनी केले.


 
Top