धाराशिव (प्रतिनिधी)- हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर स्थानक अभियानांतर्गत मुल्यमापन समितीने गुरूवारी धाराशिव बसस्थानकाला भेट दिली.
यावेळी मुंबई प्रदेशच्या प्रादेशिक व्यवस्थापक चेतना खिरवाडकर, मुंबई प्रदेशचे प्रादेशिक अभियंता विवेक लोंढे, धाराशिवचे विभाग नियंत्रक अजय पाटील, प्र. विभागीय वाहतूक अधिकारी संतोष कोष्टी, धाराशिवचे आगार व्यवस्थापक बालाजी भांगे, धाराशिव आगाराचे वाहतूक निरीक्षक काझी, याहीया अहेमद सुहेल अहेमद, सहा. वाहतूक अधिकारी मु. रा. कोमटवार, प्रवाशी मित्र राठी सह अन्य एसटी अधिकारी, कर्मचारी होते.
यावेळी मूल्यमापन समितीने धाराशिव बसस्थानकातील स्वच्छता, सुंदरीकरण, प्रवाशांसाठी असलेले सुलभ शौचालय, स्तनदा मातांच्या हिरकणी कक्षासह पिण्याचे पाणी, प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या इतर सोयी सुविधांची पाहणी करून मूल्यमापन केले. स्व. बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदरव बसस्थानक अभियानांतर्गत मूल्यमापन समितीकडून तपासणीचा तिसरा टप्पा सुरू आहे. धाराशिव बस स्थानकातील झालेल्या बदलाचे कौतुक करून लांब पल्याच्या मार्गावरील कामाचे विशेष कौतुक केले.