तेर (प्रतिनिधी)- तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या पावण भूमीची संत परंपरा जगासमोर नेण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केले.
सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी तेर येथे विविध ठिकाणी भेटी दिल्या. श्री संत गोरोबा काका यांच्या मंदिरात दर्शनासाठी आले असता आशिष शेलार बोलत होते. शेलार यांनी तेर येथील विटानी बांधलेले तिर्थकुंडाची पहाणी करून, श्री संत गोरोबा काका यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्रिविक्रम मंदिरात जाऊन दर्शन घेतले.त् यानंतर कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू संग्रहालयात जाऊन पुरातन वस्तूची पहाणी केली. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, रेवणसिद्ध लामतुरे,पद्माकर फंड,सरपंच दिदी काळे, उपसरपंच श्रीमंत फंड, माजी सरपंच नवनाथ नाईकवाडी, ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब खोचरे,डॉ गुरूप्रसाद चिवटे,नेताजी पाटील,ॲड.दत्तात्रय देवळकर, प्रविण साळुंके, मज्जित मनियार, गणेश फंड,निहाल काझी, नवनाथ पसारे,राहुल गायकवाड, सुनिल गायकवाड,चरण राजपूत, मयूर तापडे,रामा कोळी, प्रविण बंडे,संजय लोमटे,प्रतिक नाईकवाडी, अस्मिता कांबळे, विद्या माने, विठ्ठल लामतुरे, पुरातत्व विभागाचे संचालक डॉ तेजस गर्गे, उपसंचालक जया वहाणे,अमोल गोटे, अमोल सावंत, गोपाळ कदम व नागरिक उपस्थित होते.
