तुळजापूर (प्रतिनिधी)- प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे धाराशिव येथे आयोजित सभेला जात असताना तुळजापूरात अल्पविराम घेत स्थानिक उमेदवारांसाठी भव्य प्रचार रॅली काढण्यात त्यांनी पुढाकार घेतला. 

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अमर मगर तसेच प्रभाग क्र. 5 चे नगरसेवक पदाचे उमेदवार मीना अभिमान कांबळे आणि राकेश राजेश चोपदार यांच्या समर्थनार्थ ही मोर्चासदृश प्रचार रॅली काढण्यात आली. रॅलीची सुरुवात कणे गल्ली, पावनारा गणपती मंदिर येथून झाली आणि श्री तुळजाभवानी मंदिर येथे सांगता झाली. ढोलताशांचा ताल, तुतारीचा गजर, हात व मशाल चिन्हाचे फडफडते झेंडे आणि उमेदवारांचा उत्साह रॅलीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले.

रॅलीदरम्यान प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी नागरिकांना आवाहन केले की,“हात, मशाल आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून तुळजापूरच्या विकासाचा मार्ग प्रशस्त करा. हे उमेदवार कार्यक्षम, विकासाभिमुख आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांशी बांधील आहेत.”


प्रमुख मान्यवरांची उपस्थिती

या प्रचार रॅलीत अनेक मान्यवरांचा सहभाग होता. त्यातजिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटील, शहराध्यक्ष अमर चोपदार, निरीक्षक अमोल सुरवसे, बाळासाहेब चिखलकर, युवक तालुका अध्यक्ष शरद जगदाळे, गणेश नन्नवरे, स्वरूप कांबळे यांचा विशेष उल्लेखनीय सहभाग होता.

 
Top