धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष संजय पाटील दुधगावकर आणि संजय निंबाळकर यांनी ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोडावर दुधगावकर यांनी जिल्हाध्यक्षपदाचा व दुधगावकर आणि निंबाळकर यांनी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे पाठविला आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर दुधगावकर, निंबाळकर यांनी राजीनामा दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का बसला आहे. संजय पाटील दुधगावकर हे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष असून, त्यांनी यापूर्वी विधानसभा निवडणूक लढविली होती. दुधगावकर हे मास लिडर म्हणून ओळखले जातात. युती सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ न केल्यामुळे नुकतेच त्यांनी कर्जमाफीपर्यंत पायात चप्पल न घालण्याचे जाहीर केले होते.
तर संजय निंबाळकर यांनीही 2019 ची विधानसभा निवडणूक लढविली होती. थोड्या मताने त्यांचा पराभव झाला होता.

