धाराशिव (प्रतिनिधी)- श्री. काळेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान, आसू, तालुका फलटण जिल्हा सातारा येथील संस्थेचा पंडित कांबळे यांनी संपादित केलेल्या 'खुटकंदील योगीराज वाघमारे यांच्या अभ्यासक्रमीय कथा' या कथा संपादनास स्वदेशी भारत साहित्य सन्मान पुरस्कार- 2025 जाहीर झाला आहे. हुतात्मा राष्ट्रबंधू राजीव भाई दिक्षीत यांच्या जयंती व पुण्यतिथी दिनी म्हणजे 'स्वदेशी दिनी' रविवार दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी सन्मानपूर्वक मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह,प्रमाणपत्र व वृक्षाचे रोप देऊन बहाल करण्यात येणार आहे.

पंडित कांबळे हे धाराशिव येथील नगरपरिषद शाळा क्रमांक 14 येथेल शाळेत प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम करतात. त्यांचे आतापर्यंत तीन कवितासंग्रह, तीन बालकविता संग्रह, पाच संशोधनात्मक संपादित पुस्तके, एक समीक्षा ग्रंथ अशी 12 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. संपादनात 21 लेख प्रकाशित असून तीन कवितांचा हिंदी संपादनात अनुवाद प्रकाशित झालेला आहे. 54 संपादित कविता संग्रहात कवितांचा समावेश आहे. विविध पुस्तके व साहित्यिक कार्याबद्दल त्यांना यापूर्वी बावीस पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल अनेक मित्र, साहित्यिक मित्र, नातेवाईक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

 
Top