काटी (प्रतिनिधी)- तालुक्यातील काटी येथे शनिवार दि. 1 ते बुधवार दि.5 या पाच दिवसांच्या कालावधीत प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणाचा एक भाग व ग्रामीण भागातील प्रशासनाचे कार्याची माहिती समजून घेण्यासाठी म्हणून गावाला भेट देऊन येथील विकास कामांची माहिती घेतली.
या कालावधीत त्यांनी गावातील विकासकांना भेटी देऊन ग्रामविकासअधिकारी, सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधला आणि प्रशासकीय कामकाजाची प्रक्रिया समजून घेत प्रत्यक्ष ग्रामीण भागातील प्रशासकीय कामकाजाचा व ग्रामस्तरावरील विकासकांचा अनुभव घेतला.
काटी येथील विकासकांच्या आणाव्या दरम्यान प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी शिवम कुमार (उत्तर प्रदेश),स्नेहा राव (उत्तर प्रदेश),बिल्टू माजी (वेस्ट बंगाल),मोनिका जंगिड (राजेस्थान),देबासिस जेना (ओरिसा) हे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी गावातील अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना,गाव अंतर्गत गटार योजना,महिला बचत गट,येडेश्वरी कन्या प्रशाला,जिल्हा परिषद माध्यमिक व प्राथमिक शाळा, तलाठी कार्यालय, काठी येथील शेतकरी कृषी परिवर्तन फार्मर प्रोड्युसर कंपनी पाहणी,कृषी विभाग,खत दुकान,निलकंठेश्वर मंदीरला भेट देऊन सुरु असलेल्या विकासकांची माहिती घेतली व ग्रामस्तरावरील प्रशासकीय कौशल्याचा अनुभव घेतला. यावेळी सर्व अधिकाऱ्यांनी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व तेथे असलेल्या सुविधेचे कौतुक करुन या उपकेंद्राला जाणे येणेसाठी लागणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाल्याने या रस्त्यासाठी भेटी दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे अहवाल सादर करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थांना आश्वासन दिले.
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने शाल,श्रीफळ,फेटा बांधून सत्कार करुन निरोप दिला. यावेळी सरपंच आशाताई हंगरगेकर,सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख,ग्रामविकास अधिकारी लक्ष्मीकांत सुरवसे, तलाठी प्रशांत गुळवे, कृषी विभागाचे आनंद पाटील माजी सरपंच शामराव आगलावे,आदेश कोळी,प्रदीप साळुंके,मकरंद देशमुख, दादा बेग,ग्राम पंचायत सदस्य बाळासाहेब भाले,भैरी काळे,माजी उपसरपंच जुबेर शेख,चंद्रकांत काटे,संपत पंखे, प्रकाश सोनवणे, प्रकाश गाटे,बाळासाहेब मासाळ,गोकुळ सुरवसे,ग्राम पंचायत अधिकारी रमेश येलम,सहशिक्षक सुनिल खेंदाड,कृषी सहाय्यक सुर्याजी चिवरे,नानासाहेब सोनवणे, तानाजी हजारे, प्रशांत सुरवसे,सुनिल गायकवाड,कृषी अधिकारी,कर्मचारी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
