परंडा (प्रतिनिधी)- दि. 2 नोव्हेंबर 2025 परंडा येथील रहिवासी असलेले भारतीय आयुर्विमा महामंडळाचे विमा सल्लागार संजय सरवदे यांना नुकताच धाराशिव जिल्ह्यातील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या जिल्हा शाखेमध्ये मान्यवरांच्या हस्ते आनंदावीर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

संजय प्रल्हाद सरवदे यांनी 2025 -26 या वर्षांमध्ये आनंदा 2.0 या ऑनलाइन पद्धतीने जास्तीत जास्त पॉलिसी करून घेतल्यामुळे धाराशिव जिल्हा शाखेच्या वतीने त्यांचा शाखा कार्यालयामध्ये सन्मान करण्यात आला. याप्रसंगी धाराशिव जिल्हा शाखेचे शाखाधिकारी भारत कवडे तसेच मार्गदर्शक विकास अधिकारी ईश्वर दोगंड व धैर्यशील कावळे यांच्या हस्ते सदर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. संजय सरवदे यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे फुले शाहू आंबेडकर विद्वत्त सभा महाराष्ट्र राज्याचे समन्वयक प्रा.डॉ शहाजी चंदनशिवे वंचित बहुजन आघाडीचे धाराशिव जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के परंडा शहरातील मित्रपरिवार जयदेव मोरे दत्तात्रय थोरात भीमराज सरवदे पुणे शाखेचे शाखाधिकारी अविनाश शिवशरण, सहाय्यक कृषी अधिकारी प्रदीप चंदनशिवे व परंडा तालुक्यातील व धाराशिव जिल्ह्यातील अनेक मित्र परिवारांनी त्यांचे कौतुक व अभिनंदन करत पुढील यशस्वी कार्यास शुभेच्छा दिल्या.

 
Top