भूम (प्रतिनिधी)- शेगाव ते पंढरपूर रेल्वेचा भक्ती मार्ग परंडा मतदारसंघातून घ्यावा. अशी मागणी बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांना रेल्वे कृती समितीच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली.
रेल्वे कृती समितीच्या वतीने महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थस्थळ देवस्थाने तसेच प्रमुख शहरे औद्योगीकरण वसाहती व महत्त्वाच्या मोठ्या बाजारपेठा ,शैक्षणिक तेथील अग्रेसर शहरे रेल्वे पासून दूर आहेत त्यांना रेल्वेला जोडण्यासाठी भक्ती मार्ग करावा यासाठी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. शेगाव ते पंढरपूर ,सांगली ते कोल्हापूर ,जळगाव ते बीड भूम परांडा पंढरपूर कोल्हापूर ,छत्रपती संभाजी नगर बीड भूम पंढरपूर कोल्हापूर ,छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव सोलापूर अक्कलकोट हे मार्ग जोडण्यासाठी चालू असलेल्या रेल्वे मार्गांमध्ये कुर्डूवाडी ते परंडा, भूम, सरमकुंडी हा नवीन रेल्वे मार्ग तयार केल्यास व गेवराई, अंबड,जालना हे दोन रेल्वे मार्ग मंजूर केल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुके रेल्वे मार्गात जोडले जातील. तसेच देशातील जैन बांधवांचे तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र कुंथलगिरी देवस्थान, परंडा येथील इतिहासकालीन किल्ला, सोनारी देवस्थान, कल्याण स्वामी मठ डोमगाव, येडेश्वरी देवस्थान, रामलिंग अभयारण्य, तीर्थक्षेत्र तुळजापूर, ऐतिहासिक नळदुर्ग हे देवस्थान रेल्वे महाराष्ट्र बरोबर देशातील सर्व मार्गाला जोडले जातील व महाराष्ट्रातील पाच नवे रेल्वे मार्ग तयार होते. यामुळे 12 जिल्हे व 20 देवस्थान, तीर्थक्षेत्र रेल्वे मार्गाला जोडले जाणार आहेत. प्रामुख्याने विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र एकाच रेल्वे मार्गात जोडले जाऊन मराठवाड्यातील व विदर्भातील अनुशेष दूर करण्यासाठी महत्त्वकांक्षी प्रकल्प ठरू शकतो. यासाठी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रयत्न करावा असे रेल्वे कृती समितीच्या वतीने मागणी करण्यात आली.
