धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगर परिषदेची निवडणूक जवळ आली आहे. आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव शहरातील विविध राजकीय पक्षातील इच्छुक नगराध्यक्ष यांच्या हालचालीला वेग आला असून याच या निवडणुकीत धाराशिव शहरातील सिंहासनाधीश्वर तरुण गणेश मंडळ, रामनगरचे मार्गदर्शक सनी पवार यांच्या वहिनी माजी नगरसेविका राजकन्या पोपट अडसूळ यांनी ही कंबर कसली असून त्या ही धाराशिव नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत.
सौ. राजकन्या पोपट अडसूळ ह्या युवा नेते सनी पवार यांच्या वहिनी असून, सन 2016 च्या नगरसेविकाच्या निवडणुकीत विजयी होऊन नगरसेवक पदावर कामाचा त्यांना अनुभव आहे. नगरसेविका पदाच्या काळात त्यांनी स्वच्छ आणि सुरक्षित परिसर, मूलभूत सुविधा जसे की पाणी आणि कचरा व्यवस्थापन, रस्ते आणि पायाभूत सुविधांचा विकास, महिला आणि मुलांच्या समस्यांवरील लक्ष, आणि सामाजिक योजनांचा प्रचार करत सामाजिक काम केले प्रभागात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत.त्यांनी सिंहासनाधीश्वर तरूण गणेश मंडळाचे मार्गदर्शक सनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिलेला आहे. त्याचबरोबर गणेश मंडळामार्फत विद्यार्थिनींना सायकल वाटप, छत्री वाटप,घरोघरी डस्टबिन वाटप, प्रथमोपचार पेटीचे वाटप असे विविध समाजोपयोगी कार्यक्रम दरवर्षी राबविण्यात येतात. त्याचबरोबर यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक रद्द करून प्रभागात गणपती मंदिर उभारण्याचा संकल्पही केला आहे.तसेच जनतेचा शिपाई आपल्या दारी कळवा आपली समस्या या मोहिमेची सुरुवात ही त्यांनी आपल्या प्रभागापासून सुरू केलेले आहे या मोहिमेच्या माध्यमातून अनेक कुटुंबाच्या घरी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्नही त्यांनी केलेला आहे, या कार्याला जोड म्हणून शहरातील सर्व गणेश मंडळांनी सौ. राजकन्या पोपट आडसुळ यांना नगराध्यक्ष करण्यासाठी एकत्र यावे असे आवाहन केले आहे.
