धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नेहरु युवा केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने व राष्ट्रीय सेवा योजना धाराशिव यांच्या सहकार्याने जिल्हास्तर युवा महोत्सव 2025 चे आयोजन नुकतेच  धाराशिव येथे करण्यात आलेले आले होते. 

सदर जिल्हास्तर युव महोत्सवात संकल्पना आधारित विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पना, सांस्कृतिक कार्यक्रम, कौशल्य विकास कार्यक्रमत कथालेखन ,चित्रकला , वकृत्व , कविता व फोटोग्राफी, युथ आयकॉन कार्यक्रम इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गतवर्षीप्रमाणेच यंदाच्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सात विद्यार्थ्यांनी पारितोषिक मिळवले आहे. ज्यात चित्रकला स्पर्धेत जगदीश सुतारने द्वितीय क्रमांक, गौरी सुतारने तृतीय क्रमांक, वक्तृत्व स्पर्धेत समीर शेखने तृतीय क्रमांक, विज्ञान प्रदर्शनात मस्के दीक्षा, सावतार तनुजा, शिंदे स्नेहा, पोतदार मेघराज यांच्या समूहाने तृतीय क्रमांक मिळविला आहे.  तसेच नांदेड येथे आयोजित विभागीय युवा महोत्सवात याच महाविद्यालयाच्या जगदीश सुतारची (संगणकशास्त्र अंतिम वर्ष) चित्रकलेला स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.  महाविद्यालयात करत असलेला रिसर्च आणि डेव्हलपमेंट विभाग या  प्रोजेक्टसाठी महाविद्यालय सर्वतोपरी प्रयत्न करून त्या प्रोजेक्टची रूपांतर स्टार्टअप मध्ये करण्याचा प्रयत्न करेल असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी केले.

या महाविद्यालयात मागील काळातही मानवी रोबोट इलेक्ट्रिकल कार इलेक्ट्रिकल स्कूटर स्टुडन्ट अटेंडन्स मॉनिटरिंग सिस्टीम युजिंग आर एफ आय डी टेक्नॉलॉजी व लोकेशन बेस्ड वर्क ट्रॅक प्रणाली अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट तयार केले आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे समन्वयक  व डीन आर. एन डी.डॉ. सुशीलकुमार  होळंबे, सह समन्वयक प्रा.रवींद्र गुरव, प्रा.डी. बी. ठाकूर, प्रा.डी. बी. भक्ते, प्रा.बालाजी चव्हाण, प्रा.ए.के.पिंपळे, प्रा.व्ही. एस. बोंदर, डॉ.आर. बी. ननवरे या सर्वांनी  कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथांग परिश्रम घेतले  परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल तेरणा ट्रस्टचे व्यवस्थापकीय समन्वयक प्रा. गणेश भातलवंडे, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी  विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.

 
Top