धाराशिव (प्रतिनिधी)- त्रैलोक्याचे स्वामी प.पू. श्री गुरूदेव दत्तात्रेय महाराज यांच्या जन्मोत्सवनिमित्त पिताश्री श्रीमंतराव (आबा) रणदिवे प्रतिष्ठानच्या वतीने गुरूचरित्र पारायण, भजन, कीर्तन, अखंड दत्तनाम सप्ताह सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. धाराशिव शहरातील श्री सदगुरू कॉलनी, भानूनगर येथे गुरूवार, दि. 27 नोव्हेंबर ते दि. 4 डिसेंबर या कालावधीत हा सप्ताह सोहळा संपन्न होणार आहे.

शहरातील श्री सदगुरू कॉलनी येथे पिताश्री श्रीमंतराव (आबा) रणदिवे प्रतिष्ठाणच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही श्री गुरूदेव दत्तात्रेय महाराज यांच्या जन्मोत्सवनिमित्त अखंड दत्तनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहचे यंदा 11 वे वर्षे आहे. गुरूवार, दि. 27 नोव्हेंबर रोजी स. 10 वा. महंत  तुकोजी बाबा (तुळजापूर) यांच्या हस्ते  श्री गुरुदेव दत्तात्रेय महाराज, श्री तुळजाभवानी देवीजी, श्री जोतिबा देवांच्या पूजनाने सप्ताह सोहळ्यास  प्रारंभ होणार आहे.  सप्ताह सोहळ्यात स. 10 ते दु. 12.30 गुरुचरित्र पारायण, दु. 1 ते सायं. 6 भजनसेवा होणार आहे.  गुरूवार दि. 27 नोव्हेंबर रोजी दु. 1 वा. विठाई भजनी मंडळाची भजनसेवा, शुक्रवार, दि. 28 नोव्हेंबर रोजी दु. 1 ते 4 गणगणात बोते मंडळ, दु. 4 ते 6 गजानन भजनी मंडळ, शनिवार दि. 29 नोव्हेंबर रोजी दु.1 वा. ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ, रविवार दि. 30 नोव्हेंबर रोजी जिजाऊ भजनी मंडळ, सोमवार दि. 1 डिसेंबर रोजी संत जनाबाई भजनी मंडळ, मंगळवार दि. 2 डिसेंबर रोजी रुक्मिनी भजन (दु.1 ते 5) व मृदंगाचार्य तात्या टिंगरे व सहकारी भजनी मंडळ (साय. 7 ते 10), बुधवार दि. 3 डिसेंबर रोजी सखी भजनी मंडळ (दु.1 ते 4) व शोभन भजनी मंडळाची दु.4 ते 6 या वेळेत भजन सेवा होणार आहे. गुरूवार दि.4 डिसेंबर रोजी श्री दत्तगुरूंच्या पादुकांचा महाभिषेक, स. 8 वा. गुरूचरित्र ग्रंथदिंडी तर स. 10 वा. भागवताचार्य हभप अमोल बोधले महाराज यांचे काला- गुलालाचे कीर्तन होणार आहे. दु. 12.30 वा. श्री दत्तगुरूंचा जन्मोत्सव सोहळा व यानंतर दु. 1.30 वाजेपासून महाप्रसाद वाटप होऊन या सप्ताह सोहळ्याची सांगता होणार आहे.भाविक- भक्तांनी या भक्ती, आनंद व मंगलमय सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन पिताश्री श्रीमंतराव (आबा) रणदिवे प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष धनंजय रणदिवे व सद्गुरु कॉलनीतील भाविक -भक्तांनी यांनी केले आहे. 

 
Top