धाराशिव (प्रतिनिधी)- एक तेरा सात ग्रुप सातत्याने सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. या ग्रुपचे अध्यक्ष अहमद हनीफ कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास दि.20 नोव्हेंबर रोजी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

धाराशिव शहरातील एक तेरा सात ग्रुप रक्तदान शिबिर गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने आयोजित करत आहे. तर फकीरा नगर आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन ग्रुपचे अध्यक्ष कुरेशी यांनी केले. रक्त संकलनसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातील रक्त संकलन अधिकारी व स्टाफ यांनी काम पाहिले. यावेळी मकबुल टकारी, अशोक नागटिळे, अहेमद कुरेशी, फिदोज काझी, अल्ताफ शेख, चाँद सय्यद, अमजद कुरेशी, रुधीर गायकवाड, शारीक शेख, शकील काझी, अमजद शेख, कुणाल पेठे, झहीर कुरेशी, शाहीर नदाफ, जुबेर शेख, अजय कांबळे, मुजकीर कुरेशी, नवनाथ डोंगरे, सिताराम शिंदे, बिलाल कुरेशी, अकेब कुरेशी, जमीर शेख, मुजाहीर कुरेशी, तय्यब शेख, अरेफ सौदागर, सबील कुरेशी, निजाम कुरेशी, फारोक शेख, आयाज कुरेशी, अशपाक शेख आदींसह ग्रुपचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते आणि रक्तदाते प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top