धाराशिव (प्रतिनिधी)- पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू हे भारतातील एक वासाहत विरोधी राष्ट्रवादी,धर्मनिरपेक्ष, मानवतावादी, सामाजिक, लोकशाहीवादी आणि सुप्रसिद्ध लेखक होते. ते सोळा वर्ष भारताचे पंतप्रधान होते.त्यांनी संसदीय लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रचार केला आणि आधुनिक राष्ट्र म्हणून भारताच्या प्रतिमेवर जोरदार प्रभाव पाडलेला आहे.असे प्रतिपादन रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संदीप देशमुख यांनी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात पंडित नेहरू यांच्या जयंतीच्या वेळी उद्गार काढले.
धाराशिव येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी ते बोलत होते. यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. विवेकानंद चव्हाण, स्टाफ सेक्रेटरी डॉक्टर बालाजी गुंड , श्री सचिन चव्हाण, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य बबन सूर्यवंशी, प्रसिद्धीप्रमुख प्रा.डॉ.मारुती अभिमान लोंढे आदींसह महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
