धाराशिव (प्रतिनिधी)- येथील अक्षरवेल महिला साहित्य मंडळाच्या “अंकुर“ दिवाळी अंकाचे नुकतेच तहसीलदार मृणाल जाधव यांच्या हस्ते यंदाच्या विशेष बालसाहित्य विशेषांकाचे मुक्तांगण शाळेच्या प्रांगणामध्ये थाटात प्रकाशन झाले. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून प्रमुख अतिथी जाधव मॅडमनी वेळातवेळ काढून कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि अनमोल मार्गदर्शनही केले. आत्मोन्नतीसाठी आत्मभान जागृत ठेवून प्रत्येकाने सकारात्मकतेने आयुष्याची वाटचाल करावी आणि हा दृष्टिकोन आपल्या दैनंदिन जीवनात रुजवावा तसेच साहित्याचे महत्त्व आणि वाचनाचे महत्त्वही त्यांनी सांगितले. त्यांच्या प्रशासकीय सेवेतील काही अनुभवही त्यांनी कथन केले. प्रशासकीय सेवा काय किंवा दैनंदिन आयुष्य काय दररोज नवीन आव्हान येतच असते आणि त्याला आपण ध्येयाने सामोरे गेले पाहिजे असेही त्या म्हणाल्या.
याप्रसंगी अक्षरवेल महिला साहित्य मंडळ धाराशिव चे त्यांनी कौतुक केले. मंडळामार्फत चालणाऱ्या सामाजिक उपक्रमाचे देखील त्यांनी कौतुक केले. समाजभान जागृत ठेवून लिहीत राहणाऱ्याना त्यांनी प्रोत्साहन दिले. 2025 चा अंकुर चा बालसाहित्य विशेषांक मुलांना नक्कीच वाचनाची गोडी लावेल. वेळप्रसंगी आगामी दिवाळी अंक निर्मितीसाठी अर्थसाहाय्य करण्याचेही आश्वासन त्यांनी दिले.
कार्यक्रमाची सुरुवात ज्योती मगर यांच्या सरस्वती स्तवना ने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता गुंजाळ यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान आ.कमलताई नलावडे, यांनी भुषविले. प्रास्ताविक मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा डॉ. सुलभा देशमुख यांनी केले . मंडळाच्या मार्गदर्शक डॉ.अनार साळुंखे तसेच प्रेमाताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख अतिथीं च्या हस्ते ज्योती कावरे यांचा ज्योतिर्मयी, जना फासे यांचा बाराखडीची गंमत जंमत, सारिका देशमुख यांच्या उदरात तिच्या,सविता गुंड यांचा 'शब्दफुले' हा चारोळी संग्रह प्रकाशित झाल्या बद्दल मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच प्रमुख जाहिरातदारडॉ. सुलभा देशमुख, प्रेमाताई पाटील, घोडके मॅडम यांचाही सत्कार करण्यात आला. या प्रकाशन प्रसंगी अक्षरवेलच्या संस्थापक अध्यक्ष डॉ . रेखा ढगे, विद्यमान अध्यक्ष डॉ. सुलभा देशमुख, सचिव अपर्णा चौधरी, सहसचिव सुनीता गुंजाळ,जना फासे, सीमा नवले, ज्योती मगर, स्वप्नाली अत्रे, ज्योती कावरे,साधना तावडे, अर्चना गोरे, जयश्री तेरकर, वैशाली बोबडे,संध्या दिवाने,सविता गुंड,सारिका देशमुख,जयश्री फुटाणे ,सविता जाधव, अलका तावडे यांनी आपल्या रचना सादर केल्या. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रा.वैशाली बोबडे यांनी मानले.
