कळंब (प्रतिनिधी)-  रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी जगद्‌‍ गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम यांच्या सिद्ध पादुका पुजन व दर्शन  प्रवचन सोहळ्याच्या आयोजन डिकसळ येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या क्रीडा संकुलात दि. 9 नोव्हेंबर रोजी रविवार सकाळी 10 वाजता आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी झाली आसुन कार्यक्रमाच्या ठिकानी भगवा ध्वज फडकवुन व मंडपाचे भूमीपूजन दिंगबर कुंभार या दाम्पत्याच्या हस्ते झाले. 

यावेळी डिकसळ ग्रामपंचायत च्या सरपंच पुष्पा धाकतोडे,नानासाहेब धाकतोडे,शीतल चोंदे,राहुल चव्हाण, विकास कदम, अनंत बोराडे, अमर मुल्ला, गणेश शेवते आदी मंडळी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. तर जिल्हानिरिक्षक दत्ता घरत, जिल्हा सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष केसकर,उत्सव समितीचे अध्यक्ष कल्याण बोराडे, कळंब तालुकाध्यक्ष विठ्ठल काटे या कार्यक्रमासाठी परिश्रम घेत आहेत. 

दि. 9 रोजी सकाळी कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणाहून भव्य-दिव्य शोभायात्रेची सुरुवात होणार आहे. प्रथम स्थानी कलशधारी महिला ,ध्वजधारी पुरुष, विविध पथके, भजनी मंडळ, संबळ पथकासह सहभागी होणार आहेत. जगद्गुरुश्रींचे नामघोष करत रथातुन जगद्गुरुश्रींच्या सिद्धपादुका व प्रतिमेची मिरवणूक सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे.  त्यात अनेक देखावे सादर केले जाणार आहेत. कार्यक्रमाच्या ठिकाणी शोभायात्रा पोहोचल्यावर तेथे प्रथम जगद्गुरूश्रींच्या सिद्ध पादुका पूजन, व त्यानंतर सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातुन तीस ते चाळीस  हजार भाविक भक्त या वेळी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त भाविक भक्ताने लाभ घ्यावा. असे आवाहन रामानंद संप्रदाय जिल्हा धाराशिव यांच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी शंकर कांबळे, सहयोग्यता ताई अंधारे, श्रीजीत इंगळे, आकाश जाधव, लक्ष्मी माने, प्रदीप जाधवर, शिवाजी ढवळे, अनंत शेळके, बाळासाहेब होंडे ,राजेंद्र मुळीक, भारत शेळके, रमेश शिंदे ,स्वप्निल खिंडकर, जीवन चव्हाण, भास्कर जाधव सह आधी भक्तगण व महिला उपस्थित होत्या यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दत्तात्रय इंगोले यांनी मानले.  

 
Top