धाराशिव (प्रतिनिधी)- यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. ते एक स्वतंत्र्यसैनिक, राजकारणी, लेखक आणि उत्तम वक्ते होते. आपणाला यशवंतराव चव्हाण हे समजून घ्यावयाचे असतील तर त्यांचे कृष्णाकाठ हे आत्मचरित्र अभ्यासणे गरजेचे आहे.यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र कृष्णाकाठ हे त्यांनी 1913 ते 1946 या कालावधीतील त्यांच्या आयुष्यावर आधारित लिहिलेले आहे.या ग्रंथाची पहिली आवृत्ती 7 फेब्रुवारी 1984 रोजी प्रकाशित झालेली आहे. हे आत्मचरित्र वाचून विद्यार्थ्यांनी बोध घ्यावा असे प्रतिपादन रामकृष्ण महाविद्यालयाचे प्रा. डॉ. मारुती लोंढे यांनी धाराशिव येथे बिल गेट्स महाविद्यालयात केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई शाखा धाराशिव यांच्यावतीने धाराशिव येथील बिल गेट्स महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठानचे धाराशिव जिल्ह्याचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. 

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई शाखा धाराशिव चे सचिव डॉ . रमेश दाबके हे होते. त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना. यशवंतराव चव्हाण यांच्या संपूर्ण जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. यशवंतराव चव्हाण यांच्यावर आईने केलेल्या संस्काराचा प्रभाव होता आणि म्हणून ते उत्तम राजकारणी होऊ शकले असे प्रतिपादन डॉ.रमेश दापके यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी शाखा धाराशिव प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. जयसिंगराव देशमुख, सुरेखा जगदाळे , डॉ. तबसूब ॲड. विश्वजीत शिंदे, डॉ.तांबारे ,आदित्य गोरे आदीसह बिल गेट्स महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.   कार्यक्रमाचे प्रस्ताविक बिल गेट्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरशद रझवी यांनी केले. तर आभार प्रा.ज्ञानेश्वर गिरी यांनी मानले.


 
Top