धाराशिव (प्रतिनिधी)- गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्यामध्ये पाण्याचे नैर्सिगक आवर्षण आहे. त्यामुळे उजनी धरणावरून पाईपलाईनद्वारे पाणी आणले आहे. मात्र ते पाणी शहरवासियांना आवश्यकता असेल त्यावेळी मिळत नाही. ती समस्या दूर करण्यासाठी यापुढे 24 तास पाणी पुरवठा सुरू करणार असल्याचे आश्वासन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दि. 25 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषदेत दिले.

धाराशिव शहरातील भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, नगराध्यक्ष पदाच्या भाजपच्या उमेदवार नेहा काकडे, मधुकर तावडे, नेताजी पाटील आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की, धाराशिव शहरातील प्रत्येक घरामध्ये पोहचण्याच्या कार्यक्रम भाजपच्या माध्यमातून राबविण्यात आला. त्यामुळे त्यांच्या अडचणी काय आहेत? त्यांना काय पाहिजे? यांच्या सुचना त्यांनी दिल्या. त्यामुळे भाजपच्या माध्यमातून आम्ही त्या सर्व सुचना व समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आगामी काळात शहरवासियांना 24 तास पाणी उपलब्ध करून देण्याची आमचे उद्दिष्ट आहे. येणाऱ्या नजीकच्या काळात 150 कोटी रूपयांची नाली व रस्ता आदी कामे करण्यात येणार असून, पुढील पाच वर्षामध्ये त्यासाठी 500 कोटी रूपयांचा निधी आणणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. शहरात सोलर सह इतर प्रकाराच्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर आमचा भर असेल. तसेच शहरवासियांना भेडसावत असलेला कचऱ्याचा व कचरा डेपोचा प्रश्न सोडविण्यासाठी अद्यावत साधन सामुग्री आणून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात 4-4 कोटींचे दोन नवे नमो बगीचे व वृक्ष लागवड करून नगर परिषदेच्या कारभारामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

 
Top