धाराशिव (प्रतिनिधी)- वंचित बहुजन आघाडी पक्षाचे युवानेते आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नेते सुजात प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवारां करिता प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. ही प्रचार सभा बुधवार 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता क्रांती चौक भीम नगर येथे आयोजित करण्यात आली आहे. या प्रचार सभेस या जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडी धाराशिवच्या वतीने करण्यात आले आहे.
धाराशिव नगर पालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुरेखा नामदेव वाघमारे , प्रभाग क्रमांक 6 मधून नामदेव बाबुराव वाघमारे , प्रभाग 8 मधून जयदीप जीवनराव दळवे, सोनल हुंकार बनसोडे, प्रभाग 14 मधून विजयाबाई प्रल्हाद नागटिळे, शितल दादाराव चव्हाण, प्रभाग 15 मधून महादेव एडके , क्षमा सिरसाठ निवडणुकीसाठी उभे आहेत.
या उमेदवारांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते तथा सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नेते सुजात आंबेडकर हे धाराशिव येथे येणार आहेत. ही सभा बुधवार 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता क्रांती चौक भिम नगर येथे होणार आहे.या प्रचार सभेस या जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडी धाराशिवच्या वतीने करण्यात आले आहे.
