धाराशिव ( प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ.मारुती अभिमान लोंढे यांचा ज्येष्ठ अर्थतज्ञ प्रा . प्रमोद शहा आणि सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ. राजेंद्र दास यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
प्रा. डॉ. मारुती अभिमान लोंढे यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केलेली आहे.त्यांनी अनेक ग्रंथाचे लेखन केलेले आहे व त्यांना सेंट्रल यूनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका या विद्यापीठाची डि.लीट पदवी प्राप्त झालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षा आणि नेट सेट संदर्भामध्ये ते व्याख्यान देत आहेत. या त्यांच्या यशामुळे अर्थतज्ञ प्रा .प्रमोद व साहित्यिक डॉ. दास यांनी त्यांचा सत्कार केला व असाच यशाचा आलेख उंचावत रहावा अशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या.
सत्कार बद्दल प्राध्यापक डॉ. मारुती अभिमान लोंढे यांनी सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी प्रा.डॉ.सतीश घाडगे, प्रा.शुभम चवरे उपस्थित होते.
