धाराशिव (प्रतिनिधी)- खुनाच्या गुन्ह्यात धाराशिव येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. डी. देव यांनी एका आरोपीस दोषी ठरवत 10 वर्षे कैदेची व 45 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा सरकारी वकील ॲड. महेंद्र देशमुख यांनी केलेल्या युक्तीवाद ग्राह्य धरून कोर्टाने शिक्षा सुनावली.

आरोपी विष्णू लक्ष्मण लोंढे याचे व फिर्यादीची मयत पत्नी ही किराणा दुकानात नेहमी किराणा सामान घेवून जाणेकरिता येत जात असल्याने दोघांची ओळख झाली व त्यातून त्यांचे प्रेम संबंध निर्माण झाले होते. मयत व आरोपी यांच्यात फोनद्वारे बोलणे सुरू झाले. मयत घरी एकटीच असताना आरोपी हा तिचे घरात आला व त्याने मयत हीस शरीरसंबंधाची मागणी केली असता तिने विरोध केला असता आरोपीने चिडून मयत हिचे घरातील असलेले प्लास्टीकचे बाटलीतील रॉकेल तिचे अंगावर ओतून काडीपेटीने पेटवून दिले. तू जर कोणाला सांगितल्यास तुझे नवऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी देवून निघून गेला. त्यावेळी पीडिता ही भाजून जखमी झालेने तिस शासकीय रूग्णालय धाराशिव येथे उपचार कामी दाखल केले. तिचेवर उपचार चालू असताना मरण पावली. मयतावर उपचार चालू असताना मयताचा मृत्यूपूर्व जवाब नोंदविण्यात आला. त्यावेळी आरोपीने दिलेल्या तिला धमकीमुळे पीडितेने बांधकामावर पाणी मारत असताना ठिणग्या उडून डिझेलचे बाटलीवर ठिणग्या पडल्या व भडका उडाला असे सांगितले. परंतू उपचार चालू असताना पतीने विचारणा केल्यानंतर घटना सांगितली. 

सदर प्रकरणामध्ये एस. एल. दराडे पोलिस उपनिरीक्षक यांनी तपास करून दोषारोपत्र सादर केले. कोर्ट पैरवी म्हणून पवार यांनी काम पाहिले. सदर प्रकरणामध्ये अभियोग पक्षाच्या वतीने महेंद्र बी. देशमुख जिल्हा सरकारी वकील तथा शासकीय अभियोक्ता धाराशिव यांनी एकूण 11 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. सदर प्रकरणामध्ये अभियोग पक्षाच्यावतीने दिलेला पुरावा व महेंद्र बी. देशमुख यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून धाराशिव येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. डी. देव यांनी आरोपी विष्णू लक्ष्मण लोंढे यास कलम 304 (2) अन्वये दोषी ग्राह्य धरून 10 वर्षे शिक्षा व 45 हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली. 


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top