धाराशिव (प्रतिनिधी)- पोलीस अधीक्षक रितु खोखर यांचे मार्गदर्शनाखाली कम्युनिटि पोलीसींग अंतर्गत चाइल्ड राइट्स अँड यू मुंबई या संस्थेमार्फत बाल हक्क व बाल सुरक्षा विषयक कार्यक्रम दि.28.11.2025 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव येथील सभागृहात आयोजीत करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमा दरम्यान शाळेतील विदयार्थी-विदयार्थींनींना पोलीस अधीक्षक रितु खोखर यांनी पोलीसांविषयी समज-गैरसमज, बाललैंगिक अत्याचार, भारतीय न्याय संहिता व पोक्सो अधिनियमातील बालकांचे सुरक्षे संबधित असेलेल्या कलमाबाबत, व्यसनमुक्ती, गुड टच-बॅड टच, डायल 112, 1098, सायबर गुन्हे, सोशल मिडियां विषयांच्या गुन्हा संदर्भात मोलाचे मार्गदर्शन व समुपदेशन केले. तसेच किशोरी मुलींचे, शिक्षण, संरक्षण, नेतृत्व विकास सर्वांगीण उन्नती व्हावी यासाठी मुलींनी शिक्षण त्यांचे करिअर या बाबत मार्गदर्शन करुन शाळेतील विदयार्थी-विदयार्थींनींच्या अडीअडचणी जाणुन घेतल्या. यावेळी पोलीस उपनिरीक्षक आनघा घोडगे, पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद, पोलीस नाईक सारफळे हे उपस्थितीत होते.
