उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा येथील आय एस ओ मानांकित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाचे यश संपादन केलेल्या टोबॅको फ्री उमरगा जिल्हा परिषद हायस्कूलची विद्यार्थीनी कुलसुम उस्ताद हिने ज्ञान प्रबोधिनी हराळी येथे विभागीय स्तरावर सादरीकरण केलेल्या शेतकऱ्यांसाठी बायोपेस्टीसाइड्स या प्रयोगाची इन्स्पायर अवॉर्ड साठी राज्यस्तरावर निवड झालेली आहे दिनांक 17 व 18 नोव्हेंबर रोजी ज्ञान प्रबोधिनी हराळी येथे धाराशिव लातूर व नांदेड या तीन जिल्ह्यांतून 199 उपकरणांचे सादरीकरण झाले होते यात उमरगा जिल्हा परिषद हायस्कूल च्या चार उपकरणांची निवड झाली होती.
आदित्य सगर वैष्णवी नामदेव केदारे प्रतीक्षा मोरे यामधून कुलसूम उस्तादची राज्य स्तरावर निवड झाली आहे. अटल तालुका समन्वयक ताजोद्दीन सरवडे, यांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली शाळेतील विज्ञान शिक्षिका भाग्यश्री पंडित, विद्यानंद सुत्रावे यांचे मार्गदर्शन लाभले.
ेविद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा शकुंतला मोरे, सुजाता मोरे उमरगा, लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी, गटशिक्षणाधिकारी अमोल राजपूत, विस्ताराधिकारी जोशी, केंद्रप्रमुख शिला मुदगडे, अमर वरवटे, अशोक पतगे, सदानंद शिवदे पाटील, मुख्याध्यापक पद्माकर मोरे, धनराज तेलंग, बशीर शेख, सदानंद कुंभार, संजय रूपाजी, नागेश स्वामी, वर्षा राणी पाटील, सोनाली मुसळे व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले. शाळेतील विद्यार्थी पालक व समाजातील सर्व स्तरातून या विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
