धाराशिव (प्रतिनिधी)- विद्याचरण कडावकर हे धाराशिव जिल्ह्यातील रहिवाशी असून, त्यांनी नुकताच जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे.
यावेळी दैनिक भास्कर व पुरोगामी विचाराचे लोकराज्यच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड इथून आलेले कडावकर यांनी शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असलेले सातबारा विषयीचे अनेक प्रलंबित प्रश्न संपवले आहेत. एक कर्तव्यदक्ष व समाजभिमुख अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. विद्याचरण कडावकर हे जिल्ह्यातील तेरखेडा येथील रहिवासी आहेत.
