परंडा (प्रतिनिधी)- परंडा येथील जेष्ठ साहित्यिक धाराशिव जिल्हयाचा मानबिंदू गडंगणकार , समाजभूषण तुकाराम गंगावणे यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने महात्मा फुले राज्यस्तरीय साहित्य जिवण गौरव पुरस्कार नुकताच जाहीर केला आहे.सदरील पुरस्कार पुणे येथील महात्मा फुले सभागृहात दि.23 नोहेंबर 2025 रोजी वितरीत करण्यात येणार आहे.गंगावणे यांच्या साहित्य व सामाजिक कार्याची दख्खल घेऊन हा सन्मान दिला आहे .
तुकाराम गंगावणे यांना दि बेस्ट सिटीझन ऑफ इंडिया हा अंतरराष्ट्रीय अवॉर्ड मिळाला असून समाजभुषण, साहित्यरत्न, धाराशिव जिवणगौरव, तेरणा भूषण, राष्ट्र गौरव, मानवता गौरव, डॉ . बाबासाहेब आंबेडकर लेखण पुरस्कार, इंदिरा गांधी अवॉर्ड, अनमोल रत्न, प्रेरणा, संत तुकाराम महाराज पुरस्कार, समाज सुधारकरत्न, जनसेवा, असे अनेक मानाचे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे . गंगावणे यांना महात्मा फूले साहित्य जिवण गौरव पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
