वाशी (प्रतिनिधी)- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त वाशी शहरात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. वाशीतील अनिल क्षिरसागर यांच्या कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमाला तालुकाप्रमुख तात्यासाहेब गायकवाड, युवा सेना विधानसभा प्रमुख ॲड. महेश आखाडे, शहरप्रमुख अनिल गवारे, युवा सेना शहरप्रमुख संतोष चेडे, अनिल क्षिरसागर, बाळासाहेब मोळवणे, श्रीधर देशमुख, अशोक गायकवाड, सिद्धार्थ क्षीरसागर, विशाल अडगळे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते.

या प्रसंगी बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याचा व विचारांचा आढावा घेत त्यांच्या हिंदुत्व, मराठी स्वाभिमान आणि महाराष्ट्राच्या हितासाठी केलेल्या लढ्याची उजळणी करण्यात आली. ॲड. महेश आखाडे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे हे केवळ एक नेता नव्हते, तर मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारे प्रेरणास्थान होते. त्यांच्या विचारांनी आजची तरुण पिढी मार्गक्रमण करत आहे.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवर आणि शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस सामूहिकरित्या आदरांजली अर्पण करून स्मृतिदिनाला अभिवादन केले.

 
Top