उमरगा (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील उमरगा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी शेवटच्या सातव्या दिवशी पाच जणांनी तर नगरसेवक पदासाठी 76 जणांनी उमेदवारी अर्ज सोमवार दि. 17 रोजी दाखल केले आहेत. 

यात नगराध्यक्ष पदासाठी संजय वसंतराव पवार (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार), अत्तार अब्दुल रजाक बाबूलाल ( शिवसेना उबाठा ), मोरे अमोल शिवाजीराव (काँग्रेस पक्ष), नागणे विजयकुमार विश्वनाथ (शिवसेना उबाठा, औटी इमामजाफर सिकंदर (काँग्रेस पक्ष) या पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नगरसेवक पदासाठी विविध प्रभागातून शिंदे शिवसेनेच्या वतीने 8, शिवसेना उबाठा यांच्या वतीने 20, भाजपाकडून 15, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या कडून 1, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या कडून 5, काँग्रेस पक्षाकडून 15, वंचीत बहुजन आघाडी कडून 1, अपक्ष म्हणून 11 असे नगरसेवक पदासाठी 76 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

 
Top