धाराशिव (प्रतिनिधी)- येथील ब्राह्मण कल्याण ट्रस्ट, धाराशिव या सामाजिक संघटनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरात शहरातील 51 दात्यांनी रक्तदान केले.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत येथील ब्राह्मण कल्याण ट्रस्टच्या वतीने शहरातील सिनर्जी इन्फोटेक येथे आज रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत हे रक्तदान शिबीर घेण्यात आले. या रक्तदान शिबीरात शहरातील 51 दात्यांनी रक्तदान केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रक्त पेढीच्या वतीने रक्तसंकलन करण्यात आले. शिबीराच्या यशस्वीतेसाठी ब्राह्मण कल्याण ट्रस्टच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
