परंडा (प्रतिनिधी)-  परंडा - करमाळा रस्त्यावरील बावची चौकाजवळ पवार कॉम्लेक्स समोर ट्रॅक्टर व दुचाकीच्या भीषण अपघातात बार्शी येथील महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे ही घटना दुपारच्या सुमारास घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बार्शी येथील सविता शंकर मुसळे राहणार नाइकवाडी प्लॉट (वय 52 वर्ष ) हे सोनारी येथील भैरवनाथ मंदीर येथून देवदर्शन करून बार्शीकडे दुचाकीवरून जात असताना अचानक मुसळे यांना चक्कर आली असता त्या अचानक खाली पडल्याने सोनारी येथील भैरवनाथ कारखाना कडे ऊस घेऊन जात असलेल्या उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेल्याने मुसळे यांचा जागीच मृत्यू झाला.मुसळे यांचा आपघात झालेल्या ( ट्रॅक्टर क्रमांक 25 के 3717 ) आहे. घटनेची माहिती मिळताच परंडा पोलीसांनी घटना स्थळी भेट देऊन घडलेल्या घटनेचा पंचनामा करून पुढील तपास पोलीस निरीक्षक चोरमुले यांच्या मागदर्शनाखाली परंडा पोलीस करित आहे.


 
Top